बौध्द-दलितांवर होणाऱ्या अन्याय विरोधात कारवाईसाठी आरपीआयचे पुरंदर तहसील कार्यालयासमोर आंदोलन

पुरंदर, दि. ११ जुलै २०२०: गेले दोन ते तीन महिन्यात सातत्याने बौद्ध-दलित ,पारधी समाजाच्या हत्यांचे सत्र सुरु आहे. त्यातील बरेचसे आरोपी अजुनही मोकाट फिरताहेत. यातील काही आरोपी सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यामूळे या आरोपींना अटक होत नाही असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे(आठवले)तालुकाध्यक्ष पंकज धिवार यांनी केला आहे आवरली सासवड तहसिल कार्यालया समोरील आरपीआय आठवले या पक्षाच्यावतीने अंदोलन करण्यात आले.

केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री मा.रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार, राज्य सरकारच्या विरोधात संपुर्ण महाराष्ट्र भर आंदोलन छेडन्याचा आदेश दिला आहे. सातत्याने होणाऱ्या दलित-बौद्ध हत्याकांडाचे प्रमाण महाआघाडी- ठाकरे सरकारच्या कालखंडात वाढले आहे. नागपुर येथील केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास करणाऱ्या अरविंद बनसोडची हत्या झाली, पुणे येथील विराज जगतापची हत्या प्रकरण, बीड येथील पारधी बांधवांचे तिहेरी हत्याकांड, भोर येथील बौध्द युवतीची आत्महत्या अशा एक ना अनेक प्रकरणात आरोपींना अटक करण्यास दिरंगाई झालेली आहे, काही प्रकरणातील आरोपी अजुन देखील अटक झालेले नाहीत याचा अर्थ हे सरकार निष्क्रीय व असंवेदनशील आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीत पुस्तकासाठी दादर येथील हिंदू कॉलनी त ‘राजगृह’ नावाचे निवासस्थान बांधले होते. ते समस्त भारतीयांचे प्रेरणास्थान आहे त्या निवासस्थानावर काही अज्ञात समाज कंटकांनी तोडफोड केली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेवुन कठोरात कठोर कारवाई व्हावी. त्या संपुर्ण प्रकरणाची सी आय डी मार्फत चौकशी व्हावी. या सर्वच प्रकरणी सरकारने आरोपींना पाठीशी न घालता कठोर कारवाई करावी. या प्रमुख मागण्यासाठी व अशा निष्क्रीय सरकारचा निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात आली.

यावेळी गृहमंत्र्यांनी राजीनामा दयावा व ठाकरे सरकारचा निषेध अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकज धिवार यांनी पुरंदरचे नायब तहसीलदार सूर्यकांत पठाडे, पोलिस प्रतिनिधी. कॉन्सटेब्ल बाळासाहेब गोडसे यांना देण्यात आले. यावेळी युवकअध्यक्ष स्वप्निल कांबळे, उपाध्यक्ष अमोल खरात व इतर कार्यकर्ते सोशल डीस्टन्सिंग चे पालन करत मास्क लावुन उपस्थीत होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा