चार दिवसांच्या विश्रांतीनंतर डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ

नवी दिल्ली, दि. १२ जुलै २०२०: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत होती. मात्र मागील चार दिवसांपासून या वाढीवर अंकुश लागला होता. परंतु आज रविवारी पुन्हा डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलच्या किंमती मध्ये आज कोणतीही वाढ झालेली नाही.

तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार दिल्लीत डिझेलच्या दरात प्रतिलिटर १६ पैशांची वाढ करण्यात आली आहे. यासह आता दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत ८०.९४ रुपये झाली आहे. रविवारी पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल न झाल्याने गेल्या ५ दिवसांपासून किंमत ८०.४३ रुपये प्रतिलिटरवर राहिली आहे.

इंडियन ऑईलनुसार मुंबईत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ८७.१९ रुपये आहे. त्याचबरोबर डिझेलची किंमत १२ पैशांनी वाढून ७९.१७ रुपये प्रति लिटर झाली आहे. जूनमध्ये पेट्रोल प्रतिलिटर ९.१७ रुपये तर डिझेल ११.२३ रुपयांनी महागले.

रविवारी कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर ८२.१० रुपये आहे, तर डिझेलची किंमत १६ पैशांनी वाढून ७६.०५ रुपये प्रतिलिटर झाली आहे. त्याशिवाय चेन्नईत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ८३.६३ रुपये आहे, तर डिझेल दहा पैशांनी महाग होत असून ते प्रति लिटर ७८.०१ रुपये दराने विकले जात आहेत.

विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत कमी होत आहे, तरीही देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढत आहेत. सध्या भारतीय बास्केट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल सुमारे $ ४० आहे. राज्य सरकार डिझेल आणि पेट्रोलवर वेगवेगळे व्हॅट दर ठरवतात, त्या मुळे किंमती वेगवेगळ्या असतात.

एसएमएसद्वारे आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत देखील आपल्याला मिळू शकते. इंडियन ऑईल ग्राहक आरएसपीला 9224992249 क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि बीपीसीएल ग्राहक आरएसपी लिहून 9223112222 वर माहिती पाठवू शकतात. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलतात आणि सकाळी ६ वाजता अद्यतनित केले जातात.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा