पुणे, दि. १९ ऑगस्ट २०२०: कदमवाक वस्ती येथे पावसामुळे येथील स्थानिक कुटुंबांच्या घरात पाणी शिरले होते. त्या कुटूंबाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांनी नुकसान झालेल्या कुटूंबाचे पंचनामे त्वरित करून घेतले होते. शासन दरबारी पाठपुरावा करून तलाठी मंडल अधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडून नुकसानग्रस्त, कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे २५५ कुटुंबियांना आज सरपंच गौरी गायकवाड व चित्तरंजन गायकवाड, गाव कामगार तलाठी दादासाहेब झंजे, व स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे.
मागील वर्षी पावसामुळे कदमवाक वस्ती मधील घोरपडे वस्ती, कवडी माळवाडी, येथे घरामध्ये पाणी शिरून जीवन आवश्यक वस्तू, तसेच घरातील उपकरणांचे, मोठ्या प्रमाणात नुसकान झाले होते. सरपंच गौरी गायकवाड, श्री चित्तरंजन नाना गायकवाड यांनी घरोघरी जाऊन पंचनामे करून घेतले होते. शासन दरबारी पाठपुरावा करून प्रत्येक कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे १२ लाख ७५ हजार कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंच गौरी गायकवाड यांनी मागील वर्षी पावसाळ्यात १२ लाख ७५ हजार रुपये व या वर्षी १२ लाख ७५ हजार रुपयांचा दुसरा हप्ता या कुटुंबांना मिळवून दिला आहे,असे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.
कदमवाक वस्ती गावातील नागरिकांनी सरपंच व चित्तरंजन नाना गायकवाड मित्र परिवाराचे स्थानिक नागरिकांनी आभार मानले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे