कल्याण डोंबिवलीत होणार सेरोलॉजिकल सर्वेक्षण ….

डोंबिवली २६ ऑगस्ट ,२०२० : कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढतच जात आहे, अनेक उपाययोजना करून देखील केडीएमसीत रूग्णांची संख्या ही सतत वाढत आहे , धारावी पॅटर्न सुद्धा कल्याण डोंबिवलीत राबवला गेलाय मात्र तरी देखील ही रूग्णसंख्या वाढतच जात आहे . २५० ते ४०० च्या घरात रोज कोरोनाचे रुग्ण आढळतात . त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत आता सेरोलॉजिकल सर्वेक्षण होणार आहे .

कल्याण डोंबिवलीतील हॉटस्पॉट क्षेत्रात असलेले क्रांतीनगर आणि आनंदवाडी या दोन परिसरात केंद्रीय आरोग्य पथकाने सेरोलॉजिकल सर्वेक्षणाची परवानगी मागितली होती आणि शासनाकडून ही परवानगी मिळाली आहे त्यामुळे आता या सर्वेक्षणाची तयारी महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे महानगरपालिकेने हॉटस्पॉट म्हणून हे दोन प्रभाग निवडले आहेत . त्यामुळे त्यातून किती टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला आणि कोणतेही उपचार न घेता बरे झाले आहेत, याची माहिती पुढे येऊ शकते.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी थर्मल स्कॅनिंगने घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले होते . सुरुवातीला केडीएमसीत कोरोनाचे हॉटस्पॉट कमी प्रमाणात होते मात्र आता ही संख्या वाढली आहे . मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यापासून कोरोनाचा प्रादु्र्भाव हा वाढत जात आहे . त्यामुळे हे सेरोलॉजिकल सर्वेक्षण करणे गरजेचे आहे असे म्हटले जात आहे .

न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा