कर्जत, २८ ऑगस्ट २०२०: कर्जत येथे काँग्रेसच्या वतीने कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक काँग्रेस कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष सचिन घुले यांनी केले, तर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, तालुकाध्यक्ष किरण पाटील, तात्यासाहेब ढेरे, कर्जत- श्रीगोंदा काँग्रेसचे प्रभारी स्मितल वाबळे, समन्वयक राहुल उगले, एन एस यु आय चे जिल्हा कार्याध्यक्ष आदेश शेंडगे, आदींनी मार्गदर्शन केले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी बोलताना लोकांमध्ये जाऊन काम केले तर लोक जोडले जातील, आगामी काळात युवकांना जास्तीत जास्त संधी दिली जाणार असून युवक संघटनेचा प्रशासनाला विचार करावाच लागतो, नगर पंचायतच्या सतरा प्रभागात तयारी सुरू करावी लागेल, आघाडी होईल अथवा नाही मात्र आपल्याला पूर्ण ताकदीने लढायचे आहे असे सांगितले.
केंद्र सरकार सध्या काँग्रेसने उभ्या केलेल्या अनेक सरकारी कंपन्या विकायला निघाले आहे व भाजप खोटे बोलते पण रेटून बोलतात, या भाजपा सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्याशिवाय काही केले नाही हे भाजपाई फक्त जाती धर्मात वाद लावण्याचे काम करत आहेत, अशी जोरदार टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळूके यांनी केली. कोट्यातील शिक्षण सम्राटांनी परीक्षा घेण्यासाठी मोठा निधी दिला असून आपल्याला या परीक्षा होऊ नये यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असेही ते म्हणाले. आगामी काळात आपल्या सर्वांना समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम करायचे आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी मार्केटचे संचालक अँड हर्षल शेवाळे, नगरसेवक डॉ संदीप बरबडे, ओंकार तोटे, अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाअध्यक्ष माजिद पठाण, शहराध्यक्ष अमोल भगत, एनएसयुआयचे तालुकाध्यक्ष राम जहागीरदार, अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष जोया सय्यद, आदी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी युवकचे शहराध्यक्ष अमोल भगत यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मिलिंद बागल यांनी केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष