अंदमानमध्ये अल्ट्रा-फास्ट ४ जी नेटवर्क सेवा देणारी पहिली कंपनी एअरटेल

अंदमान, ३० ऑगस्ट २०२०: भारत विकसित राष्ट्र होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात आधुनिक सुविधा पुरविल्या पाहिजेत. अंदमानच्या पोर्ट ब्लेअरमध्ये अलीकडेच सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल कनेक्टिव्हिटी प्रकल्प पूर्ण झाला. त्याअंतर्गत अंदमानला हायस्पीड इंटरनेट सुविधा मिळेल. टेलिकॉम कंपनी एअरटेल ही पहिली कंपनी आहे जिने तेथे अल्ट्रा-फास्ट ४ जी नेटवर्क सुरू केले.
वेगवान इंटरनेटमुळे तेथील लोकांचे जीवनमान बदलू शकेल. यामुळे ऑनलाइन शिक्षण, टेलि-हेल्थ, ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस आणि बेटांवरील पर्यटन यासारख्या डिजिटल सेवेला प्रोत्साहन मिळेल. ३० डिसेंबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रकल्प सुरू केला होता आणि चेन्नई ते अंदमान पर्यंत २,३१२ कि.मी. ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम सुरू केले.
याची किंमत सुमारे १,२२४ कोटी रुपये आहे. पोर्ट ब्लेअर व्यतिरिक्त अंदमान आणि निकोबार बेटे, स्वराज बेट, लिटल अंदमान, कार निकोबार, कमारोटा, ग्रेट निकोबार, लाँग आयलँड, रांगत येथे इतर ६ बेटांवर जलद इंटरनेट सुविधा देखील उपलब्ध आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा