पुरंदर, दि. ७ सप्टेंबर २०२०: पुरंदर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढती आहे. तालुक्यामध्ये कालपर्यंत १४९२ रुग्ण सापडले असून त्यापैकी ५३ जण मयत झाले व ४०४ रुग्ण विविध हॉस्पिटल्समध्ये उपचार घेत आहेत.
या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यांमधील सर्व व्यापारी यांची बैठक घेण्यात आली. पण व्यापाऱ्यांनी सासवड शहर बंद करण्यास नकार दिल्याने सासवड नियमितपणे सुरळीत चालू ठेवण्यावर आज शिक्कामोर्तब झाल्याचे तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी पत्रकार परिषदेमध्ये घोषित केले. त्याच बरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
कोरोना संदर्भात आढावा घेत पुढे करावयाच्या उपाय योजना या संदर्भात आज सासवड नगर परिषदेच्या कार्यालयात व्यापारी नागरिक प्रतिनिधी व प्रशासन यांची एक बैठक घेण्यात आली होती. यावेळी व्यापाऱ्यांनी बाजार पेठ बंद ठेवण्यास विरोध दर्शवला.यावेळी सरनोबत म्हणाल्या की, पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये कोरोना चे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कोमेडीअर सर्वे चालू आहे. त्याचबरोबर व्यापाऱ्यांनी जर नियमांचे उल्लंघन केले तर ७ दिवसानंतर पुन्हा वेगळा निर्णय घेतला जाईल.
सध्या वाघेरे कॉलेजमध्ये ७५ दिवे १०७ जेजुरी ४५ रुग्ण ठेवण्यासाठी कोरोना केअर सेंटर बेड उपलब्ध आहेत.यावेळी सासवड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी विनोद जळक यांनी सांगितले की, बाजारपेठ पूर्णपणे सुरु ठेवण्यात येईल. सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी नऊ ते सहा व शनिवार-रविवार बाजार पेठ बंद ठेवण्यात येईल. तसेच हॉटेल मध्ये फक्त पार्सल सुविधा उपलब्ध असेल. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कृषी विभागाचे १० कर्मचारी उद्यापासून नियुक्त करण्यात येणार आहेत. यावेळी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मार्तंड बोंडे व यशवंत काका जगताप उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे