पुणे, १७ सप्टेंबर २०२० : पुणे जिल्ह्यातल्या एकंदर २ लाख ३५ हजार ८५२ कोविड रुग्णांपैकी १ लाख ८८ हजार १५४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सध्या ४२ हजार ४४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आता पर्यंत ५ हजार २५५ रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्याचं मृत्यूचं प्रमाण २ पूर्णांक २३ शतांश टक्के इतके आहे तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७९.७८ शतांश टक्के आहे.
या पार्श्वभूमी पुण्यातल्या जम्बो कोविड रूग्णालयात जास्तीत जास्त रुग्णांना सेवा देण्याच्या दृष्टीने आजपासून एकंदर २५० कोविड खाटा कार्यान्वित झाल्या आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी यबाबत आढावा बैठक घेऊन खाटांची संख्या वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या.
दरम्यान जम्बो रूग्णालयातून रुग्ण बरे होऊन गेल्यानंतर सात दिवस त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली जाणार आहे. त्या दरम्यान त्यांना पुन्हा लक्षणे आढळून आल्यास आवश्यकतेनुसार त्यांच्यावर उपचार करण्यात येतील, अशी माहिती रुग्णालयाच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: