वाघोली: दि. २७ सप्टेंबर २०२० अपघाताची आग गुन्ह्याची माहिती देण्यासाठी व गावातील तातडीची माहिती नागरिकांना एकाच वेळी फोन कॉल द्वारे शेकडो नागरिकांना कळविण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावी ठरत असल्याचे डी. के. गोर्डे यांनी सांगितले आहे.
वाघोली येथे ग्रामसुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामसेवक, सरपंच, सदस्य, पोलीस पाटील, यांना गोर्डे यांच्याकडून देण्यात आले व गावात चोरी झाली आग लागली लहान मुल हरवले वाहन चोरीला गेले शेतातील पिकांची चोरी झाली अपघात झाला पुर आला वन्यप्राण्यांनी हल्ला केला रेशनिंग ग्रामसभेची माहिती कळविणे अशी कुठलीही आपत्तीच्या वेळी किंवा तातडीची माहिती कळविण्यासाठी १८००२७०३६०० या क्रमांकावर तक्रार केली किंवा मदत मागितली तर त्या गावातील व परिसरातील सगळे लोक तुमच्या मदतीला येतील अशी संकल्पना ग्रामसुरक्षा यंत्रणेची आहे.
ग्रामसुरक्षा यंत्रणा कोणत्याही मोबाईल मधून कार्यरत होणार असून गावातील शेकडो नागरिकांना फोन कॉलर एकाच वेळी संदेश अथवा माहिती देण्यासाठी ही यंत्रणा उपयोगी ठरणार आहे. या यंत्रणेचा दुरूपयोग केल्यास गुन्हा देखील दाखल होऊ शकतो सदरची योजना कार्यन्वित करण्यासाठी ग्रामपंचायततीला खर्च करावा लागणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे