सीबीआयचे १६९ ठिकाणी छापे.

नवी दिल्ली: देशातील वेगवेगळ्या बँकांमध्ये घोटाळ्यांचे प्रकार समोर येत असताना सहा हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी दाखल झालेल्या ३५ गुन्ह्यांच्या अनुषंगाने केंद्रीय कन्वेंशन विभागाने (सीबीआय) देशभरात १६९ ठिकाणी छापे घातल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याकारणामुळे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील तपशील जाहीर केलेला नाही. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी देशातील विविध शहरांमधील बँकांच्या ठिकाणी ही कारवाई केली.
यामध्ये दिल्ली, गुडगाव, चंदिगड, लुधियाना, देहरादून, नोएडा, बारामती, मुंबई, ठाणे, सिल्वासा, कल्याण, अमृत्सर, फरीदाबाद, बंगळूर, तिरुपुर, चेन्नई, मदुराई, कोचीन भावनगर आणि हैदराबाद आदी शहरांचा समावेश आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा