रोहतांग, ३ ऑक्टोबर २०२० : आपल्याला देशाचे लष्करी सामर्थ्य वाढवायचं असून त्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेअतर्गत स्वदेशी शस्त्रास्त्र निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. देशाची सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्याच्या कामी अटल बोगदा महत्त्वाची भूमिका बजावणार असून त्यामुळे सर्व हंगामात जवानांना वेळेत रसद पोहोचविणे शक्य होणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
हिमाचल प्रदेशात रोहतांग इथं तयार करण्यात आलेल्या सर्वाधिक उंचीवरील जगातल्या सर्वात लांब अटल बोगद्याचं उद्घाटन आज काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.प्रारंभी ९५० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरून सुरु करण्यात आलेल्या या कामासाठी ३ हजार दोनशे कोटी रुपये खर्च आला. मात्र, जनतेसाठी रस्ते, पाणी अशा पायाभूत सुविधा निर्माण करणं हे आपल्या सरकारचं प्रथम प्राधान्य असल्याचं मोदी म्हणाले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यावेळी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी