वाराणसी : हवा प्रदूषणाचा फटका माणसाला बसल्याचे आपण ऐकले आहे.परंतु या प्रदूषणाचा फटका देवाला बसल्याचे कधी ऐकले आहे का? नाही पण हे होताना दिसत आहे.
हवेच्या प्रदूषणाचा देवाला त्रास होऊ नये म्हणून वाराणसी मधील एका देवाच्या मूर्तीला मंदिराच्या पुजाऱ्याने मास्क घातले आहे.
तसेच काशीतील भगवान शंकराच्या मंदिरातील मूर्तींना त्या मंदीराचे पुजारी यांनी मास्क घातल्याचे येथील मंदिराच्या पुजाऱ्याने आमच्या प्रतिनिधिकडे सांगितले.
दुर्गा माता, काली माता आणि साईबाबा यांच्या मूर्तींनाही पूजा केल्या नंतर मास्क घातल्याचे येथील पुजारी हरीश मिश्रा यांनी सांगितले.