बारामती, १७ ऑक्टोबर २०२० : आज असणाऱ्या घटस्थापनेच्या पूजेच्या साहित्यांसाठी बारामती तसेच आसपासच्या गावातून मोठी गर्दी पाहायला मिळाली यामध्ये महिला ,वयस्कर व लहान मुलांचा जास्त समावेश होता.सध्या असणाऱ्या कोरोना संसर्गाच्या धर्तीवर अशाप्रकारे गर्दीमुळे संसर्गाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.नागरिकांनी सर्व नियम पायदळी तुडवल्याचे चित्र आज शहरात पाहायला मिळाले आहे.
बारामती शहरात कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने बारामतीकर जरा निर्धास्त होत असताना दोन दिवसांपासून शहरात घटस्थापनेच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होते आहे.घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य माती,घट, फुल,हार नारळ घेण्यासाठी महिलांची जास्त गर्दी दिसली बाजारात आज नागरिकांनी कोणत्याही नियमांचे पालन केले नसल्याचे दिसत होते.गणेश भाजी मंडई ,गुणवडी चौक ,मेन रोडला स्त्यावर थाटलेल्या दुकानांमुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता.नवरात्र उत्सवात विशेषतः महिलांचा सहभाग जास्त असतो.
खरेदीसाठी कोणताही सोशल डिस्टन्स पाळला जात नव्हता तर कोरोना सारखा संसर्ग मागील काही दिवसांपर्यंत धुमाकूळ घालून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते याचा देखील बारामतीकरांना विसर पडल्याचे विदारक चित्र आज पाहायला मिळाले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव