कॅलिफोर्निया, २३ ऑक्टोबर २०२०: गुगल सॉफ्टवेअर डेव्हलप करणारी जगातील एक मोठी कंपनी आहे. त्यामुळे सहाजिकच या कंपनीचे अनेक लोकप्रिय ॲप्स देखील आहेत. मुळात आत्ताचे बहुतांशी स्मार्टफोन हे गुगलच्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर चालतात. त्यामुळे सॉफ्टवेअर मध्ये ही कंपनी किती मोठी आहे हे लक्षात येते. गुगल चे असेच एक लोकप्रिय ॲप ‘गुगल प्ले म्युझिक’ गुगल ने बंद केले आहे. याचा अंदाज तेव्हाच आला होता जेव्हा गुगल ने युट्युब म्युझिक लॉन्च केले होते. तुम्हाला हेही माहीत असेल की, युट्यूब प्लॅटफॉर्म देखील गुगलने तयार केला आहे.
गुगल प्ले म्युझिक ८ वर्षांपूर्वी २०११ मध्ये लाँच केले गेले होते. हे काही काळ बीटा व्हर्जन मध्ये ठेवले गेले होते आणि त्यानंतर नोव्हेंबर २०११ मध्ये ते अंतिम करण्यात आले. विशेष म्हणजे यावर्षी ऑगस्टमध्ये गुगलने म्हटले होते की आता कंपनी हळू हळू गुगल प्ले म्युझिक बंद करेल. ऑक्टोबर महिना सुरू होताच गुगल ने युट्युब म्युझिक सुरू करताच गुगल प्ले म्युझिक हे आपले लोकप्रिय ॲप बंद केले आहे. सध्या ज्यांच्या मोबाईलमध्ये हे ॲप आधीपासूनच इन्स्टॉल होते त्यांच्या मोबाईल मध्ये हे ॲप ओपन करताच युट्युब म्युझिकचा ऑप्शन समोर येतो.
हे ॲप आता कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. ओपन करताच बंद करण्यात आल्या बाबतचा मेसेज स्क्रीनवर येतो. ॲप बंद करण्यात आले असले तरी काही दिवसांसाठी गुगलने वापरकर्त्यांना आपली प्लेलिस्ट गुगल म्युझिक वर सिंक्रोनाइज् करण्यासाठीचा देखील पर्याय दिला आहे. त्यामुळे तुम्ही बनवलेल्या प्लेलिस्ट किंवा आवडत्या युट्युब म्युझिकशी जोडल्या जातील.
युट्युब म्युझिक वरील काही सेवांचा वापर करण्यासाठी तुम्हाला सबस्क्रीप्शन देखील घ्यावे लागेल. अर्थात या ॲप वरील सर्व सुविधा मोफत देण्यात आलेल्या नाहीत. गुगल प्ले म्युझिक मोबाईलचा डिस्प्ले ऑफ असतानादेखील बॅकग्राऊंड मध्ये चालू राहत होते. परंतु, युट्युब म्युझिक मध्ये हा पर्याय देण्यात आलेला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु गुगल प्ले म्युझिक वरून युट्युब म्युझिक मध्ये गेले असता डिस्प्ले ऑफ असताना गाणे देखील थांबतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे