भारत-अमेरिका बीईसीए करारामुळं चीनचा तिळपापड

नवी दिल्ली, २७ ऑक्टोबर २०२०: भारत आणि अमेरिका यांच्यात ऐतिहासिक बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन एग्रीमेंट (बीईसीए) करार झाला आहे. मंगळवारी दोन्ही देशांमध्ये २ + २ चर्चा झाली, ज्यामध्ये दोन्ही देशांचे संरक्षण आणि परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर दोन्ही देशांकडून संयुक्त निवेदन जारी करण्यात आलं आहे. दोन्ही देशांदरम्यान बीईसीए करारावर स्वाक्षरी झाली, तसंच अणु सहकार्याविषयी चर्चा पुढं गेली. दोन्ही देशांनी सामायिक पत्रकार वार्ता माध्यमातून चीनलाही कडक संदेश दिला.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री सातत्यानं मजबूत झाली आहे, २ + २ च्या बैठकीतही दोन्ही देशांनी अनेक विषयांवर चर्चा केली. ज्यामध्ये कोरोना संकटानंतरची परिस्थिती, जगाची सद्य स्थिती, सुरक्षेच्या मुद्दय़ांवर बर्‍याच महत्त्वपूर्ण बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या मते, दोन्ही देशांनी अणु सहकार्य वाढविण्यासाठी पावलं उचलली आहेत, तसेच भारतीय उपखंडातील सुरक्षा परिस्थितीबद्दलही सविस्तर चर्चा केली आहे.

या पाच करारावर स्वाक्षर्‍या:

१. मूलभूत विनिमय आणि सहयोग करार म्हणजेच बेसिक एक्सचेंज अँड कॉर्पोरेशन एग्रीमेंट (बीईसीए)

२. पृथ्वी विज्ञानांवरील तांत्रिक सहकार्यासाठी सामंजस्य करार/एम ओ यु फोर टेक्निकल को-ऑपरेशन ऑन अर्थ सायन्सेस

३. आण्विक सहकार्यावरील व्यवस्थेस विस्तारित करण्याची व्यवस्था/ एग्रीमेंट एक्सटेंडींग द अरेंजमेंट ऑन न्यूक्लिअर को-ऑपरेशन

४. टपाल सेवांवर करार/एग्रीमेंट ऑन पोस्टल सर्विसेस

५. आयुर्वेद आणि कर्करोगाच्या संशोधनात सहकार्याबाबत करार

सामायिक विधानात कोण काय म्हणाले?

अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री केवळ आशियासाठीच नाही तर जगासाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री म्हणाले की, चीनकडून जगाला धोका वाढत आहे, अशा परिस्थितीत बड्या देशांना एकत्र यावं लागंल. मार्क एस्परच्या म्हणण्यानुसार भारत-जपान आणि अमेरिका एकत्रितपणे अनेक सैन्य कारवाई करतील, मलबार एक्सरसाइज म्हणजेच युद्ध अभ्यास केले जाईल. या व्यतिरिक्त दोन्ही देश डिफेंस इन्फॉर्मेशन शेयरिंग/संरक्षण माहिती सामायिकरणात नव्या टप्प्यावर पुढं जात आहेत.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ म्हणाले की आज जगात मोठ्या गोष्टी घडत आहेत, दोन्ही देश नवीन अपेक्षा घेऊन पुढं जात आहेत. पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात भारत-अमेरिका मैत्री आणखी मजबूत झाली आहे. माईक पोम्पीओ म्हणाले की, आज सकाळी मी युद्ध स्मारकात भारतीय सैन्याच्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली, ज्यात गल्वान खोऱ्यात मृत्यूमुखी पडलेल्या २० सैनिकांचा समावेश आहे.

माईक पोम्पीओ म्हणाले की, चीननं पसरवलेल्या विषाणूचा फटका संपूर्ण जगावर दिसून येत आहे, चीनची कम्युनिस्ट पार्टी अनेक युक्त्या अवलंबून जगाला घाबरवण्याचा सतत प्रयत्न करीत आहे. पण, भारत आणि अमेरिका केवळ चीनच नव्हे तर इतर सर्व आव्हानांचा सामना करण्यास तयार आहेत. भारत-अमेरिका संरक्षण, सायबर स्पेस, अर्थव्यवस्था या क्षेत्रात आहेत आणि ते मजबूत आहेत. आम्ही यूएनएससीमध्ये भारताच्या कायम जागेचे/परमनंट सीट समर्थन करतो.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, आज झालेले संभाषण दोन्ही देशांचे जगावरील परिणाम दाखवणारी आहे, आम्ही जगातील बर्‍याच मोठ्या विषयांवर चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये अनेक स्तरांवर आर्थिक, संरक्षण, माहितीचे वाटप, तसेच या क्षेत्रात सतत प्रगती याविषयी चर्चा झाली आहे. जयशंकर म्हणाले की, आज अमेरिका आणि भारत यांची बैठक केवळ दोन देशांमधील बैठक नव्हे तर जगावर होणाऱ्या परिणामाबद्दलही या बैठकीत चर्चा झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा