बायडेन यांचं पावसातील भाषण आणि विजय… पवार पॅर्टनचा डंका अमेरिकेतही

वॉशिंग्टन, ८ नोव्हेंबर २०२०: संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा अखेर निकाल लागला आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी आपली व्हाईट हाऊस मधील जागा पक्की केली. जो बायडेन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होणार असून त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. जिंकण्यासाठी आवश्यक आसलेल्या २७० पेक्षा जास्त मते बायडेन यांना मिळाली.

मी सर्व अमेरिकेन नागरिकांचा राष्ट्राध्यक्ष

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूकीत जो बायडेन यांनी विजय मिळवल्यानंतर एक ट्विट करत आपल्या भावन व्यक्त केल्या. ट्विटमधे त्यांनी लिहिले की, देशाचे नेतृत्व करण्यासाठी माझी निवड होणं हा माझा सन्मान, तुम्ही मला मतं दिले असतील किंवा नसतील पण आता मी या पुढे संपूर्ण अमेरिकन नागरिकांचा अध्यक्ष म्हणून काम करेन.

डोनाल्ड ट्रम्प यांना निकाल मान्य नाही

गेल्या अनेक महिन्यांपासून ते काल पर्यंत आपणच जिंकलो आहे. अशी विधानं आपल्या समर्थकांसमोर डोनाल्ड ट्रम्प हे करत आले. पण, चित्र हे त्यांच्या विरोधातच होतं. डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला आसून जो बायडेन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्याचे सर्वत्र वृत्त आहे. मात्र, ट्रम्प यांनी निकाल मान्य करण्यास नकार दिलाय. तसेच “बायडेन चुकीच्या पद्धतीनं स्वताला विजेता सांगत आहेत, ही निवडणूक संपली नाही, कोणत्याच राज्यानं निकाल घोषित केला नाही, फेरमोजणी होत आहे,आम्ही कायदेशीर आक्षेप ही घेतला आहे असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेत एक नवा इतिहास

अमेरिकेत जो बायडन हे राष्ट्राध्यक्ष होणार असून उपराष्ट्राध्यक्ष पदी भारतीय वंशाच्या कमला हॅरीस या विराजमान होणार आहेत. कमला हॅरीस यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून येणार्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आणि आशियाई महिला आहेत. कमला हॅरीस यांची आई श्यामला गोपालन या भारतीय आसून त्या मुळच्या तमिळनाडूतील होत्या.

पवार पॅर्टनचा डंका अमेरिकेतही

गेल्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांनी पावसात भिजत भाषण केलं होतं आणि त्याचा काही अंशी फायदा पक्षाला झाला होता.असेच एक चित्र अमेरिकेत देखील पहायला मिळाले. अमेरिकेचे ४६ वे होणारे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या देखील सभेत पावसानं शिरकाव केला तेव्हा बायडेन यांनी देखील आपलं भाषण चालुच ठेवले होतं. हे दोन फोटो राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शेयर केले आसून “पवाराप्रमाणं बायडन यांनीही पावसात भिजत प्रचारावेळी भाषण केलं. तसेच पवार पॅर्टन हे अमेरिकेत ही काम करत आहे.”परिश्रमांची निष्ठा अखंडपणे विजय मिळवते”असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटंलय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा