किल्ल्यांनी जपला…ऐतिहासिक वारसा

तिकोणा किल्ला

“तिकोणा किल्ला साधारण पुण्यापासून ६०किमी अंतरावर असणारा हा किल्ला. हा किल्ला समुद्र सपाटीपासून ३५०० फूट उंचीवर असणारा हा किल्ला. या किल्ल्यावरून ३-४किमी असणारा तुंग किल्ला दिसतो. या किल्ल्याचा आकार त्रिकोणी असल्यामुळे त्याला तिकोणा असे नाव पडले.”

तिकोणा किल्ल्याचा तसा इतिहास उपलब्ध नाही. परंतु १४८२-८३च्या सुमारास पंधराव्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमद निजामशहा याने जुन्नर प्रांतावर स्वारी त्याने जुन्नरचा बराचसा भाग आणि लोहगड काबीज करून घेतला. नंतर त्याने आपला मोर्चा तुंग आणि तिकोणा गडाकडे वळवला. इ.स.१५८५मध्ये मलिक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला.

त्यानंतर इ.स.१६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून पुन्हा स्वराज्यात आणला. त्यानंतर ११जून १६६५साली झालेल्या ‘पुरंदरच्या तहात’ शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३किल्ल्यांपैकी तिकोणा हा किल्ला देखील दिला होता.तसेच नेताजी पालकर यांच्याकडे देखील त्यावेळी किल्ल्यांची जबाबदारी होती.

तिकोणा किल्ला हा शिवाजी महाराजांनी केलेल्या अनेक कामगिरीची साक्ष देतो. इतिहासात जरी त्याची फार नोंद नसली तरी तिकोणा किल्यावर स्वराज्याच्या अनेक गोष्टी याच किल्ल्यावर ठरवल्या जायच्या. तिकोणा किल्ला आज अनेक गोष्टींची साक्ष देतो.

पर्यटनाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर या किल्ल्यावर जुन्या काळालातील काही गोष्टी आढळतात. चारही बाजुंनी सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत. त्याचा आकार त्रिकोणी असल्यामुळे तो किल्ला दिसण्यास आकर्षक आणि उठावदार दिसतो. अनेक पर्यटक फिरण्यासाठी या किल्ल्यावर जातात. तसेच आजच्या तरुणाईला ट्रेकींगचे फार वेड आहे. त्या दृष्टीने तरुण मुलं ग्रुपने या किल्ल्यावर ट्रेकिंग करण्यासाठी येतात.

त्यामुळे तिकोणा किल्ल्याचा जरी फार इतिहास नसला तरी शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ला असल्यामुळे त्याला एक विशेष महत्व आहे. कारण निजामशाहितुन तो किल्ला शिवाजी महाराजांनी पुन्हा मराठेशाहीत आणला होता.

-प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा