केव्हा येणार बाजारात कोव्हॅकसिन…?

नवी दिल्ली, ९ डिसेंबर २०२०: कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त होण्यासाठी देश आणि जगात लस चाचण्या सुरू आहेत. आपल्या देशातही कोरोना लसीची चाचणी चालू आहे. भारत बायोटेक निर्मित कोरोना लस कोव्हॅकसिनची चाचणीही सुरू आहे. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे याची चाचणी सुरू आहे.

एम्समधील लसीच्या चाचणीचे मुख्य अन्वेषक डॉ. संजय राय यांनी मंगळवारी सांगितले की, कोव्हॅक्सिनची चाचणी सुरू आहे. यास आणखी चार आठवडे लागतील. त्यांनी सांगितले की, दिलेल्या लसीच्या पहिल्या डोसचा अंतरिम डेटा अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी घेईल. या आधी कोणताही वाव नाही.

भारत बायोटेक लसीसाठी आणीबाणीच्या वापराबद्दल डॉ. संजय राय म्हणाले की, नियामकांना धोकाापेक्षा अधिक फायदा आहे असे वाटत असेल तर त्याचे मूल्यांकन केले जाईल. पण याच्या अंतिम विश्लेषणासाठी आणखीन तीन चरण पार पडणे आवश्यक आहे.

तत्पूर्वी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण म्हणाले की, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांनी आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे. पत्रकार परिषदेत राजेश भूषण म्हणाले की, एकदा त्यांच्या वैज्ञानिकांची परवानगी मिळाल्यानंतर लसीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू केले जाईल. लस निर्मितीसंदर्भात सर्व प्रकारच्या तयारी पूर्ण झाल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असेही म्हटले आहे की फार्मास्युटिकल क्षेत्रातील नियामक कोरोनाच्या तीन लसींवर गंभीरपणे विचारविनिमय करीत आहे आणि लवकरच त्या सर्व किंवा काहींना परवाना मिळण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा