नीरा (पुरंदर), १२ डिसेंबर २०२०: पुरंदर तालुक्यातील नीरा येथे देशाचे माजी कृषी व संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५० युवकांनी रक्तदान केलं. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्ताचा तुटवडा असल्यानं तरुणांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. तसंच राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षांनिही याबाबत कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या. त्यामूळं नीरा येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.
आज सकाळी पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव चव्हाण यांनी या शिबिराचा सुभारंभ केला. यावेळी पुरंदर पंचायत समितीचे उपभापती गोरखनाथ माने, दत्ताजी चव्हाण, बाळासाहेब ननावरे, अल्ताप सय्यद, राजेश काकडे, राजेश चव्हाण, अनिल चव्हाण, पृथ्वीराज काकडे गणेश दरेकर, उमेश चव्हाण, किरण जेधे, दयानंद चव्हाण, प्रमोद काकडे, भैय्यासाहेब खाटपे, मिलिंद भोसले, प्रकाश शिंदे
कमेश जावळे, राजू देसाई इत्यादी उपस्थित होते.
पुना सिरॅलॉजीकल इन्स्टिट्युट ब्लड बँकेच्यावतीनं रिंकू शेंडगे, आकांक्षा आहेर, प्रियका तुतारे, मंगेश जाधव अनिश शेख, राहुल कुडेकर, उद्धव चौधरी
यांनी रक्त संकलित करण्याचं काम केलं. सकाळी ११ ते सायंकाळी पाच पर्यंत चाललेल्या या शिबिरात ५० तरुणांनी रक्तदान केलं.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दत्ताजी चव्हाण यांनी रक्तदानाचे महत्व पटवून सांगितलं. ते म्हणाले की, ‘राज्यात कोरोनामुळं नेहमीचे रक्त दाते रक्तदानासाठी पुढं येत नाहीत किंवा रक्त पेढीत जाऊन रक्तदान करणारांची संख्या कमी झाली आहे. सध्या वेगवेगळ्या कारणानं रक्ताची गरच असते. वेळेवर रक्त मिळालं नाही तर रुग्णाचा प्राण जाऊ शकतो. आपण रक्त दिलं तर एका व्यक्तीनं दिलेल्या रक्तामुळं १० जणांचे प्राण वाचू शकतात. त्यामूळं तरुणांनी अशाप्रकारे शिबिरे आयोजित करून रक्तदान करणं गरजेचं आहे.’
नीरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं हे शिबिर घेण्यात आलं. निरेतील सामाजिक कार्यकर्ते व शरद पवार प्रेमी भैय्यासाहेब खाटपे यांनी हे शिबिर आयोजित करण्यासाठी सहकार्य केलं.
न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे