बरेली, १५ डिसेंबर २०२०: लग्न म्हंटलं की गोंधळ आलाच. प्रत्येक लग्नात काहीतरी विचित्र घटना हमखास घडतात आणि या घटनांचं निवारण झालं नाही तर याचं रूपांतर मोठ्या अडचणीत होतं. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या बरेली मधे घडली आहे. ज्यामुळं भर मांडवात लग्न मोडलं.
उत्तर प्रदेश मधील बरेली मधे एका लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला बळजबरी डान्स करायला ओढलं. जे नवरदेवाला चांगलेच महागात पडलं. डान्स करण्यासाठी ओढल्या नंतर दोन्ही कुटुंबात मोठा वाद निर्माण झाला आणि नंतर भरमांडवातच लग्न मोडलं.
फक्त लग्नच मोडले नाही तर नवरीकडच्यांनी मुलाच्या विरोधात हुंडा घेतला म्हणून पोलीस स्टेशन मधे तक्रार नोंदवली. त्यानंतर नवरदेवाच्या मंडळीना साडेसहा लाख रूपये परत करावे लागले. मित्रांनी केलेल्या या उद्दोगामुळं नवरदेवाला हा सर्व प्रकार महागात पडला.
हा सर्व प्रकार होऊन दोन दिवस उलटल्यानंतर नवऱ्या कडचे मंडळी मुलीच्या घरी समजूत काढण्यासाठी केले. त्यांनी मुलीकडच्यांना साधेपणानं लग्न लावून देण्याची विनंती केली. परंतु, यावेळी मुलीनंच नकार दिला. ती म्हणाली की, “लग्न समारंभा दरम्यान मला अतिशय वाईट वागणूक देण्यात आली. ज्यामुळं मी हे लग्न करू शकत नाही.”
त्याच बरोबर संपूर्ण प्रकरणाबद्दल बिथरी चैनपूरचे एसएचओ अशोक कुमार सिंह म्हणाले, “मुलीच्या कुटूंबानं हुंडा घेतल्याची तक्रार दिली होती. परंतु, एफआयआर दाखल झालेला नाही. दोन कुटुंबांमधील ही बाब होती. नंतर दोन्ही बाजूंच्या लोकांनी हे प्रकरण निवळतं घेतलं ”
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव