बारामती, २२ डिसेंबर २०२०: काल दि.२१ सोमवारी कपडे इस्त्रीसाठी दुकानात दिले असताना कपड्यात चुकून आलेले सात हजार रुपये दुकानाचे मालक अजित पवार यांनी प्रामाणिकपणे परत केले. सध्या कोरोना महामारीमुळे बाजारपेठेत आर्थिक उलाढाल शांत असताना आज देखील समाजात प्रामाणिक लोक आहेत. याचे हे उत्तम उदाहरण आहे.
बारामती शहरातील कासब्यातील अजित ड्रायक्लिनर्स दुकानामध्ये इस्त्री करण्यासाठी आलेल्या कपड्यांमध्ये चुकुन सात हजार रूपये खिश्यात आले होते. इस्त्री करत असताना दुकानाचे मालक पवार यांना पॅन्टच्या खिशात साथ हजार रुपये असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी कपड्याचे मालक संजय सातव यांना फोन वरून पैश्याबाबत कल्पना दिली.
सातव व त्यांच्या कुटुंबियांनी पवार यांच्या दुकानात येऊन त्यांचे व कामगारांचे आभार मानले. या पूर्वी देखील अनेक वेळा चुकून पैसे किंवा मौल्यवान वस्तू कपड्यात येतात त्या आम्ही परत केल्या आहेत.पवार यांच्या प्रामाणिक पणाचे सगळ्यांनी कौतूक केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव