मळी व केमिकल मिश्रित पाण्याची सोय करावी अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल

माढा, ५ जानेवारी २०२१: टेंभुर्णी एमआयडीसीमधील ‘खंडोबा डिसलरी’ या कंपनीमधील मळी व केमिकल मिश्रित सांडपाणी कंपनी उघड्यावरती सोडत असून त्यातीलच काही पाणी कंपनी सदर कंपनीच्या पाठीमागे असलेल्या तळ्यामध्ये सोडत आहे. हे उघड्यावरती व तळ्यांमध्ये सोडण्यात येणारे केमिकल व मळी मिश्रित सांडपाणी कंपनीने ताबडतोब बंद करावे,अन्यथा कंपनीच्या गेट समोर आंदोलन करण्यात येईल.

वरील संदर्भाचे निवेदन मा उपप्रादेशिक अधिकारी सो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सोलापूर यांना ही काल देण्यात आले आहे. मा. उपप्रादेशिक अधिकारी सो यांनीही कंपनी विरुद्ध लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

कंपनीने स्वतःहून हे मळी व केमिकल मिश्रित पाणी सोडणे बंद करावे व या आगोदर सोडलेल्या उघड्यावरील पाण्याची विल्हेवाट लावावी, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा टेंभुणी शहराच्या वतीने कंपनीच्या गेट समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची सदर कंपनीने दखल घ्यावी.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा