मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसचे नाव ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’?

मुंबई, ७ जानेवारी २०२१: सध्या देशभरात अनेक ठिकाणांचे नावं बदलण्याचे राजकारण चालू आहे. तर अनेक शहरांचे नामांतर झाले आहे. अश्यातच महाराष्ट्रात देखील शहरांच्या नामांतरावरून राजकरण चांगलच तापलं आहे. आधीच औरंगाबाद ला छत्रपती संभाजी नगर नाव द्या म्हणून राजकीय कार्यकर्त्यांची मागणी जोर धरत आहे तर आता मुंबई सेंट्रल कडे देखील हा मोर्चा वळाला आहे.

आता पश्चिम रेल्वे स्थानकावरील मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसचे नाव बदलण्याची मागणी शिवसनेना खासदार अरविंद सावंतांनी केलीय. मुंबई नगरीच्या औद्योगिक-सामाजिक पायाभरणीत जगन्नाथ शंकरशेठ (नाना शंकरशेठ) यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळेच मुंबई सेंट्रल टर्मिनसला’नाना शंकरशेठ’ यांचे नाव देण्यात यावे. असे पत्र सावंतांनी लिहीलं आहे.

जगन्नाथ शंकरशेठ कोण?

जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म मुंबईत सोनार व्यापारी कुटुंबात १० फेब्रुवारी १८०३ रोजी झाला. मुंबई शहराच्या विकासासाठी नानांनी स्वताच्या जमिनी सरकारला दिल्या. १८५७ मधे त्यांनी फर्स्ट ग्रेड अँग्लो व्हर्नाक्युलर स्कूल सुरु केले. १८५५ मधे त्यांनी विधी महाविद्यालयाचा पाया घातला. सर ग्रँटच्या मृत्यूनंतर ग्रँट मेडिकल काॅलेजची १८४५ मधे स्थापना करून येथे वैद्यक-शिक्षणाची सोय त्यांनी केली.

नानांनी मुलींच्या कन्याशाळेसाठी डाॅ विल्सन यांना स्वताचा वाडा दिला.

स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी बक्षिस वितरणाचा कार्यक्रम स्वखर्चाने सुरू केला.

गॅस कंपनी सुरू केली. जे जे हाॅस्पिटलचा पाया घालुन त्यांनी रूग्णसेवेस चालना दिली.

नानांचे वयाच्या ६२ व्या वर्षी देहावसान झाले. त्यांच्या स्मरणार्थ संस्कृत विषयात पहिला येणार्या विद्यार्थ्यास शंकरशेठ शिष्यवृत्ती देण्यात येऊ लागली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा