उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जिजाऊ करिअर अकॅडमीला भेट

बारामती ,२८ जानेवारी २०२१ : बारामती तालुका मराठा सेवा संघाने सुरू केलेल्या जिजाऊ करिअर अकॅडमीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली येथे गरीब वंचित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याची व्यवस्था केली असुन.सध्या अकॅडमी मध्ये ४० विद्यार्थी ९ विद्यार्थीनी अभ्यास करत आहेत.
जिजाऊ करियर अकॅडमी मध्ये गरजु विद्यार्थ्यांना वायफाय ची सुविधा आहे.तसेच आय पी एस अधिकारी मार्गदर्शन करणार असल्याने विद्यार्थ्यांना फायदा होईल. तसेच स्पोकन इग्लिश क्लास सुरू केले आहेत.ग्रामीण तालुका पातळीवर सर्वात अद्यावत अशी अभ्यासिका असणार आहे. विद्यार्थ्याना लेक्चर हॉल कॉन्फरन्स हॉल, प्रोजेक्टर व्हिडीओ कॉन्फरन्स या सुविधा असणार आहेत.
बारामती तालुका मराठा सेवा संघ जिजाऊ भवन व पवार ट्रस्ट यांच्या तर्फे दरवर्षी वंचीत, गरजु व हुशार विद्यार्थ्यांना ८ लाख रुपये शिष्यव्रुती दिली जाते.अकॅडमीचे काम पाहुन पवार यांनी कौतुक केले याप्रसंगी विश्वस्त नामदेव तुपे, प्रदिप शिंदे, देवेंद्र शिर्के, प्रमोद शिंदे, दीपक बागल, एन जी रनवरे, पोपट वाबळे,माजी नगराध्यक्ष जयश्री सातव, संगिता ढवान, वंदना पोतेकर,मनोज पोतेकर, सुधीर शिंदे , जिजाऊ सेवा संघाचे हेमलता परकाले स्वाती ढवान, राजेद्र खराडे,सचिन सावंत जयकुमार मोरे आदी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा