आज राष्ट्रीय पत्रकारिता दिन

दरवर्षी १६ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो.
केंद्र सरकारने ४ जुलै १९६६ रोजी प्रेस काऊंसिल ऑफ इंडियाची स्थापना केली होती. भारतातील पत्रकारितेची निकोप वाढ व्हावी व गुणवत्तात्मक विकास व्हावा हा त्यामागचा उद्देश होता. सर्व तांत्रिक, कायदेशीर व प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यावर १६ नोव्हेंबर १९६६ रोजी काऊंसिलचे काम सुरू झाले. म्हणून हा दिवस ‘राष्ट्रीय पत्रकारिता दिन’ म्हणून साजरा होऊ लागला. बाळशास्त्री जांभेकर यांनी २१ जून १८३२ मध्ये मराठीत ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू केले. दरम्यानच्या काळात हिंदी व अन्य भारतीय भाषांमध्ये अनेक वृत्तपत्रे देखील सुरू झाली.
स्वातंत्र्य पूर्व काळात पत्रकारिता हे देशातील जनतेला एकत्र आणण्यासाठी स्वातंत्र्य लढा लढण्यासाठी कार्यरत होती पण आता पत्रकारितेचा व्यापक क्षेत्रात प्रभाव पडलेला दिसतो.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा