अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाला कोंडीत पकडलं

नागपूर: आजपासून १८ नोव्हेंबर रोजी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तोकडी असून, शेतकऱ्यांना २५ हजार रूपये मदत देण्याच्या मागणीसाठी शिवसेना मोदी सरकारविरोधात आक्रमक झाली आहे.
एनडीए’तून बाहेर पडलेल्या शिवसेना खासदारांची बसण्याची जागा विरोधी बाकांवर करण्यात आल्यानंतर शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाला कोंडीत पकडलं आहे.  लोकसभेत कामाला सुरूवात झाल्यानंतर शिवसेनेच्या खासदारांनी शेतकऱ्यांना जास्तीची मदत देण्यासाठी अतिरिक्त निधी देण्याची मागणी करीत गदारोळ घातला. तसेच त्यानंतर सभागृहाचा त्याग करत सर्व खासदार बाहेर पडले. शिवसेनेच्या सर्व खासदारांनी संसद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन केले. तसेच मदतीसाठी लोकसभेत तहकूब नोटीस दिली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा