अफगाणिस्तानात निर्माण झालेल्या स्थितीवरून रशियाची अमेरिकेवर जोरदार टीका

पुणे, १८ जुलै २०२१: अफगाणिस्तानात निर्माण झालेल्या स्थितीवरून रशियाने अमेरिकेवर जोरदार टीका केली आहे. अफगाणिस्तान मध्ये निर्माण झालेल्या भयंकर स्थितीला रशियाने अमेरिकेला जबाबदार ठरविले आहे. शुक्रवारी रशियाने म्हणले की, अमेरिका अफगानिस्तान मध्ये आपल्या योजनेत विफल झालाय. अफगाणिस्तानातून अमेरिकन तसेच नाटो सैन्य परत बोलावल्यामुळे अफगाणिस्तान मध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप देखील केला. अमेरिकन आणि नाटो सैन्य अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्यानंतरच तालिबानने अफगाणिस्तानमधील विविध भागांवर आपला कब्जा जमावलाय. असा दावा करण्यात येत आहे की, तालिबानने आतापर्यंत अफगाणिस्तानातील ८५ टक्के भागावर ताबा मिळवलाय.

रशियन परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव म्हणाले की, व्हाईट हाऊस असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य आणि नाटो सैन्य परत बोलावणे हे एक योग्य पाऊल होते. परंतु वास्तवात अफगाणिस्तानात सुरू केलेल्या मोहिमेमध्ये अमेरिका पूर्णपणे विफल झाला आहे.

रशियन परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी शुक्रवारी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गणी यांच्यासोबत उज्बेकिस्तान मध्ये झालेल्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये अमेरिका वर निशाणा साधला. रशियन परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी यापूर्वी देखील अफगाणिस्तानातून सैन्य मागे बोलावणे धोक्याचे सांगितले होते. ते म्हणाले होते की, अफगाणिस्तानमधून असे अचानक पणे विदेशी सैन्य काढून घेतल्याने अफगाणिस्तानात पुन्हा एकदा अस्थैर्य निर्माण होईल. याचा परिणाम आजूबाजूच्या देशांना देखील भोगावा लागू शकतो.

पत्रकारांशी बोलताना रशियन परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव म्हणाले की, अलिकडच्या काळात, दुर्दैवाने, आम्ही अफगाणिस्तानच्या परिस्थितीत कमालीची ढासळलेली स्थिती पाहिली आहे. यूएस आणि नाटो सैन्याच्या घाईघाईने माघार घेतल्यामुळे देशातील राजकीय आणि लष्करी परिस्थितीच्या भविष्याबद्दल प्रचंड अनिश्चितता निर्माण झाली आहे.

रशियन परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी यापूर्वी अमेरिकन सैन्याने माघार घेणे “घाईघाईचे पाऊल” असे म्हटले होते. ते म्हणाले की, नाटो सैनिकांमुळे अफगाणिस्तानात सुरक्षा व्यवस्था अधिकच खराब होत आहे, लावरोव यांनी शेजारच्या देशांनाही याबाबत सतर्क केले होते.

गेल्या आठवड्यात मॉस्कोमध्ये अफगाणिस्तानासंदर्भात तालिबानी प्रतिनिधींशी चर्चा झाली. या बैठकीत तालिबान्यांनी अफगाणिस्तानातील जवळपास ८५ टक्के भागावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे. मॉस्को तालिबानबाबतच्या परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहे. रशियाला तालिबानमुळे शेजारील देशांमधील संभाव्य संकटाची चिंता आहे. अफगाणिस्तानातील परिस्थिती बिघडल्याने शेजारच्या देशांमधील निर्वासितांची संख्या वाढेल, अशी भीती रशियाला वाटत आहे. यामुळे दहशतवादी संकटही उद्भवू शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा