श्रीनगर, २४ ऑगस्ट २०२१: जम्मू -काश्मीरच्या श्रीनगरमधील बटमलू भागात सुरक्षा दलाने चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. यामध्ये अब्बास शेख प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा / टीआरएफचा टॉप कमांडर होता. दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख साकीब मंजूर म्हणून झाली आहे. तो भिल लष्कर-ए-तैयबा/टीआरएफचा सर्वोच्च कमांडर होता.
हे दोन्ही दहशतवादी सामान्य लोकांच्या हत्येत सहभागी होते. सांगितले जात आहे की या दोन दहशतवाद्यांचा शोध बराच काळ सुरू होता. जम्मू -काश्मीर पोलिसांचे म्हणणे आहे की १० पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ही कारवाई केली. चकमकीच्या वेळी दोघेही शस्त्रे बाळगत होते.
यापूर्वी जम्मू -काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. नागबेरान त्राल परिसरातील जंगलात झालेल्या चकमकीत ठार झालेले तीन दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते.
ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख जैश-ए-मोहम्मद दहशतवादी वकील शाह म्हणून झाली आहे. हा तोच दहशतवादी आहे ज्याने भाजप नेते राकेश पंडित यांची गोळ्या घालून हत्या केली. यापूर्वी २० ऑगस्ट रोजी पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचे दोन दहशतवादी ठार झाले होते.
आज होणार ‘गुपकर’ बैठक
गुपकर पीपल्स अलायन्सची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी होणार आहे. या महत्त्वाच्या बैठकीत जम्मू -काश्मीरमधील सद्यस्थितीवर चर्चा केली जाईल आणि खोऱ्यातील सद्य परिस्थितीवर एक रणनीती तयार केली जाईल. गुपकर हे जम्मू -काश्मीरला विशेष दर्जा बहाल करण्याची मागणी करणाऱ्या ६ मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांचे गठबंधन आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे