तालिबानचं वक्तव्य – डोकं आणि हात कापण्याच्या शिक्षा आवश्यक, यामुळं लोकांमध्ये भीती वाढते

काबुल, 25 सप्टेंबर 2021: अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या राजवटीत, यावेळीही लोकांचे हात कापण्यासारख्या क्रूर शिक्षेची मालिका सुरूच राहणार आहे. हे इतर कोणी नाही तर खुद्द तालिबानचे संस्थापक सदस्य मुल्ला नुरुद्दीन तुराबी यांनी म्हटलंय. तुराबी यांनी वृत्तसंस्था एपीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, चुकीचं काम करणाऱ्यांना कठोर शिक्षा आणि हात किंवा डोकं करण्याचा युग लवकरच परत येईल, परंतु यावेळी ते कदाचित सार्वजनिक होणार नाही.


तुराबी म्हणतात की सुरक्षिततेसाठी हात कापणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण अशा शिक्षांमुळं लोकांमध्ये भीती वाढते. अशा शिक्षा सार्वजनिकरित्या दिल्या जाव्यात की नाही यावर तालिबान मंत्रिमंडळ विचार करत आहे आणि त्याचं धोरण लवकरच बनवलं जाईल.


इस्लामचं अनुसरण करणार, कुराणच्या आधारे कायदे बनवणार


तुराबी यांनी असा युक्तिवाद केलाय की, स्टेडियममध्ये सार्वजनिकरित्या शिक्षा देण्याची आमची पद्धत चुकीची आहे, परंतु आम्ही कधीही कायदा आणि कोणालाही शिक्षा करण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह लावलं नाही. त्यामुळं आमच्या कायद्यांविषयी कोणीही बोलू नये, आम्ही इस्लामचं पालन करू आणि आपले कायदे कुराणवर आधारित करू.


अफगाणिस्तानात पूर्वीच्या तालिबान राजवटीची क्रूरता जग विसरलं नाही. 90 च्या दशकात, जेव्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं राज्य होतं, तेव्हा लोकांना स्टेडियम आणि काबूल येथून ईदगाह मशिदीच्या मैदानावर सार्वजनिकपणे शिक्षा देण्यात आली. हे पाहण्यासाठी शेकडो लोकही जमले. जरी या वेळी तालिबाननं दावा केला होता की त्याच्या पद्धती पूर्वीसारख्या नसतील, परंतु तुराबीच्या वक्तव्यानंतर सर्व काही स्पष्ट झालं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा