युएई, 18 ऑक्टोंबर 2021: टीम इंडियाने मिशन टी 20 वर्ल्डकपची तयारी सुरू केली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी सोमवारी इंग्लंडविरुद्ध पहिल्या सराव सामन्यापूर्वी सराव सत्रात भाग घेतला. विशेष गोष्ट म्हणजे टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही टीम इंडियामध्ये मेंटॉर म्हणून सामील झाला आहे.
टीम इंडियाच्या सरावाच्या सत्राचे फोटो बीसीसीआयने शेअर केली होती. मेंटर एमएस धोनी टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक एस. श्रीधरशी संभाषण करताना दिसतो. फोटो बघून असे वाटते की प्रत्येकजण फलंदाजीबद्दल बोलत आहे.
सर्व खेळाडूंनी टीम इंडियाच्या सराव सत्रात भाग घेतला. फोटोमध्ये विराट कोहली, वृषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रोहित शर्मा यांच्यासह संघातील सर्व 15 खेळाडू दिसत आहेत. यासह, राखीव खेळाडूंच्या यादीचा भाग असलेले अक्षर पटेल, उम्रान मलिकसह इतर खेळाडू देखील उपस्थित होते.
सोमवारी टीम इंडियाचा पहिला सराव सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
भारताला 20 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामनाही खेळायचा आहे. भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी होणार आहे. सुपर -12 टप्प्यात भारताला एकूण पाच सामने खेळायचे आहेत, पाकिस्तान व्यतिरिक्त न्यूझीलंड, अफगाणिस्तानशी सामना होईल. तर फेरी -1 नंतर दोन संघांची निवड केली जाईल.
टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचा संघ:
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (wk), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी
राखीव खेळाडू: श्रेयार अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे