नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर 2021: लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर आणखी M777 अल्ट्रा-लाइट हॉवित्झर तोफांची संख्या वाढवत आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालानुसार, भारताने नोव्हेंबर 2016 मध्ये अमेरिकेला 145 हॉवित्झरची ऑर्डर दिली होती ज्याची किंमत 75 कोटी डॉलर होती. जून 2022 पर्यंत, लष्कराला आणखी 56 M777 मिळतील. आतापर्यंत 89 हॉवित्झर वितरित करण्यात आले आहेत. लडाखमधील एलएसीजवळ भारत आणि चीनमध्ये 18 महिन्यांहून अधिक काळ तणाव सुरू आहे. अरुणाचल प्रदेशातही चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) आपल्या कारवाया तीव्र केल्या आहेत.
M777 च्या निर्मात्या BAE Systems ने 25 रेडीमेड हॉवित्झर वितरित केले आहेत आणि बाकीचे सरकारच्या मेक इन इंडिया धोरणाचा भाग म्हणून महिंद्रा डिफेन्ससह भारतात उत्पादित केले जात आहेत. या तोफांची रेंज 30 किमीपर्यंत आहे. परंतु चांगल्या परिस्थितीत ते 40 किमी पेक्षा जास्त अंतरापर्यंत हल्ला करण्यास सक्षम आहे. गरजेनुसार हॉवित्झर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवता येतात.
उच्च उंचीच्या भागात तैनात करणं सोपं
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य लेफ्टनंट जनरल एसएल नरसिंहन (निवृत्त) म्हणाले की, उर्वरित M777 समाविष्ट केल्याने सैन्याला मोठी चालना मिळंल. टायटॅनियम आणि अॅल्युमिनियमपासून बनवलेल्या हॉवित्झरचं वजन सुमारे 4 हजार किलो आहे, परंतु चिनूक हेलिकॉप्टर उच्च उंचीच्या भागात नेण्यास सक्षम आहे. अरुणाचल प्रदेशातील आर्टिलरी ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडियर संजीव कुमार यांनी यापूर्वी सांगितलं होतं की, अशी अनेक क्षेत्रं आहेत जिथं जड तोफखाना तैनात करता येत नाही. परंतु M777 ला चिनूकवर स्लिंग लोड करून वेगानं तैनात केले जाऊ शकते.
इतर शस्त्रे FARP अंतर्गत खरेदी केली जाणार
M777 हा लष्कराच्या फील्ड आर्टिलरी रिलेशनशिप प्लॅनचा (FARP) अविभाज्य भाग आहे, जो 1999 मध्ये मंजूर झाला होता. 50 हजार कोटींच्या FARP अंतर्गत, नेट्रॅकने सेल्फ प्रोपेल्ड गन, ट्रक-माउंटेड गन सिस्टीम, टोव्ड आर्टिलरी पीस आणि व्हीलेड सेल्फ प्रोपेल्ड गन यासह नवीन 155 मिमी शस्त्रं समाविष्ट करण्यासाठी रोड मॅप तयार केलाय.
M777 व्यतिरिक्त, लष्कराने K9 वज्र-T आटोमैटिक आर्टिलरी आणि 155 मिमी बोफोर्स लडाख सेक्टरमध्ये तैनात केले आहेत. खाजगी क्षेत्रातील संरक्षण कंपनी लार्सन अँड टुब्रो आणि दक्षिण कोरियाची हानव्हा टेकविन (HTW) यांनी भारतात प्रगत मोबाइल K9 तोफा विकसित केल्या आहेत. या तोफा मैदानी भागात तैनात करायच्या होत्या, पण लष्कराने त्या उंचीवर तैनात करण्यासाठी काही किरकोळ बदल केले आहेत. भारत आणि चीनने लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये एलएसीच्या दोन्ही बाजूंनी लष्करी हालचाली वाढवल्या आहेत. दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे