पीएफ ट्रान्सफर करायचा आहे पण माहित नाही UAN? काही मिनिटांत शोधू शकता UAN नंबर

पुणे, 13 फेब्रुवारी 2022: तुम्ही नुकताच नवीन जॉब जॉईन केला आहे? मग नवीन पीएफ खात्यात रक्कम हस्तांतरित करू इच्छिता. आता फॉर्म भरण्याची आणि सबमिट करण्याची वेळ निघून गेली आहे. आता ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन झालीय. तुम्ही घरी बसल्या काही मिनिटांत डेट ऑफ एग्जिट (Date of Exit) स्वतः भरू शकता. यासह, तुम्ही पीएफ (PF Transfer Online) ट्रान्सफर करू शकता आणि क्लेमद्वारे (PF Claim Online) पैसेही काढू शकता.

UAN क्रमांक माहित असणं आवश्यक

पीएफशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचा UAN (Universal Account No) माहित असणं आवश्यक आहे. यासोबतच ॲक्टिव UAN असणं देखील आवश्यक आहे. परंतु जर तुम्हाला UAN माहित नसेल, तर तुम्ही खाली दिलेल्या प्रोसेस फॉलो करून तुमचा UAN जाणून घेऊ शकता.

UAN क्रमांक शोधण्यासाठी स्टेप-बाय-स्टेप पद्धत

  1. तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या ब्राउझरवर https://www.epfindia.gov.in/ उघडा.
  2. आता Home च्या शेजारील Services वर क्लिक करा.
  3. येथे तुम्हाला ‘For Employees’ पर्याय मिळंल.
  4. ‘For Employees’ वर क्लिक करा.
  5. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडंल.
  6. येथे डाव्या बाजूला असलेल्या सर्विसेज सेक्शन मध्ये Member UAN/ Online Service (OCS/ OTCP) वर क्लिक करा.
  7. यासोबत तुमच्या समोर एक पेज ओपन होईल.
  8. या पेज वर, Important Linksचा सेक्शन उजव्या बाजूला तळाशी आढळेल.
  9. येथे दुसऱ्या क्रमांकावर तुम्हाला ‘Know your UAN’ चा पर्याय दिसंल.
  10. तुमच्या समोर एक नवीन पेज उघडंल.
  11. या पेजवर 10 अंकी मोबाईल नंबर टाका.
  12. कॅप्चा कोड टाईप करा आणि ‘ Request OTP’ वर क्लिक करा.
  13. यानंतर, OTP टाकण्यासाठी तुमच्या समोर एक रिकामी जागा दिसेल.
  14. रिकाम्या जागेत OTP टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि नंतर सबमिट करा.
  15. आता एक नवीन पेज तुमच्या समोर येईल.
  16. येथे तुमचं नाव टाईप करा. त्यानंतर जन्मतारीख निवडा. यानंतर, आधार (Aadhaar No) / पॅन आणि Member ID मधील कोणताही एक number टाईप करा.
  17. कॅप्चा कोड टाकल्यानंतर Show My UAN वर क्लिक करा.
  18. आता तुमच्या समोर UAN नंबर येईल.
    ही प्रक्रिया फॉलो करण्यापूर्वी, तुम्ही लक्षात ठेवा की तुमचा मोबाईल नंबर तुमच्या EPF खात्याशी जोडलेला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा