श्रीलंकेत आंदोलकांवर पोलिसांनी केला गोळीबार, एक ठार, 10 जखमी

कोलंबो, 20 एप्रिल 2022: श्रीलंकेत देशाच्या दुरवस्थेविरोधात निदर्शने वाढत आहेत. मंगळवारी आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. यादरम्यान पोलिसांनीही गोळीबार केला, ज्यामध्ये एका आंदोलकाचा मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी आपल्या चुकीच्या निर्णयांमुळे देश इतक्या भयानक आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे मान्य केलंय, अशी माहिती आहे. सर्व काही ठीक होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

असं म्हणाले राजपक्षे

श्रीलंकेचे राष्ट्रपती म्हणाले, “गेल्या अडीच वर्षांत आम्हाला कठीण आव्हानांना सामोरं जावं लागलंय. कोविड-19 साथीच्या आजारामुळं कर्जाचा बोजा आणि आमच्या काही चुका… त्या सुधारण्याची गरज आहे.” आम्हाला वाढायचं आहे. आम्हाला लोकांचा विश्वास परत मिळवायचा आहे.”

या चुकांचा केला उल्लेख

श्रीलंकेचे राष्ट्रपती म्हणाले की, कर्जाचा बोजा वाढल्याने त्यांनी ताबडतोब आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (आयएमएफ) संपर्क साधायला हवा होता. यासोबतच देशात रासायनिक खतांवर बंदी घालायला नको होती. श्रीलंका सरकारने देशातील शेती पूर्णपणे सेंद्रिय बनवण्यासाठी रासायनिक खतांच्या वापरावर बंदी घातली होती.

शेअर बाजार बंद

श्रीलंकेने काही काळ इतर देशांचे कर्ज फेडता येणार नसल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, 16 एप्रिल रोजी श्रीलंकेचा मुख्य शेअर बाजार कोलंबो स्टॉक एक्सचेंजमध्ये 18 एप्रिलपासून पाच दिवस व्यवहार होणार नसल्याचा अहवाल आला होता. श्रीलंकेच्या सिक्युरिटी कमिशनने कोलंबो स्टॉक एक्सचेंजला हा आदेश दिला. देशाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन गुंतवणूकदारांना ही वेळ देण्यात आलीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा