पुणे, 8 जुलै 2022: पक्षातील बंडखोरीनंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन राजीनामा देणार आहेत. कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या 41 मंत्र्यांनी दबाव टाकून दोन दिवसांत राजीनामा दिला होता.
बोरिस जॉन्सन यांच्यावरील दबावाची ही प्रक्रिया 5 जुलै रोजी सुरू झाली, जेव्हा यूके सरकारमधील अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी राजीनामा दिला. यानंतर आरोग्यमंत्री साजिद वाजिद यांच्या राजीनाम्याने त्यांच्या खुर्चीवरील संकटही वाढले होतं.
सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या चार कॅबिनेट मंत्र्यांनी आतापर्यंत राजीनामा दिला आहे. सुनक आणि साजिद वाजिद यांच्याशिवाय सायमन हार्ट आणि ब्रँडन लुईस यांचाही यात समावेश आहे.
नव्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक यांची पहिली पसंती
बोरिस जॉन्सन सरकारमध्ये भारतीय वंशाचे अर्थमंत्री असलेले ऋषी सुनक हे देशाच्या पुढील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पुढे असल्याचं सांगण्यात येत आहे. सुनक हे इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि ज्येष्ठ उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.
42 वर्षीय व्यक्तीने फेब्रुवारी 2020 मध्ये इतिहास घडवला जेव्हा त्यांना बोरिस जॉन्सन सरकारमध्ये अर्थमंत्री बनवण्यात आलं. या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला, एका आघाडीच्या ब्रिटीश सट्टेबाजने देखील भाकीत केलं होतं की बोरिस जॉन्सन लवकरच राजीनामा देऊ शकतात आणि ऋषी सुनक त्यांच्या जागी नवीन पंतप्रधान होऊ शकतात.
सुनक व्यतिरिक्त पेनी मॉर्डंट, बेन वॉलेस, साजिद वाजिद, लिझ ट्रस आणि डॉमिनिक राब यांचीही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नावं आली आहेत.
ऋषी सुनक यांचा जन्म आणि प्रारंभिक जीवन
ऋषी यांचे आई-वडील भारतीय वंशाचे होते. सुनक यांचे आजोबा 1960 च्या दशकात ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. ऋषी यांचा जन्म 12 मे 1980 रोजी साउथम्प्टन, यूके येथे झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते तर आई दवाखाना चालवायची. ऋषी तीन भावंडांमध्ये सर्वात मोठे.
ऋषी सुनक यांचं शिक्षण आणि कारकीर्द
भारतीय वंशाच्या ऋषी यांचा जन्म यूकेमधील साउथॅम्प्टन येथे झाला. त्यांनी यूकेच्या विंचेस्टर कॉलेजमधून राज्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला, जिथं त्यांनी तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला. ते स्टॅनफोर्ड विद्यापीठात फुलब्राइट स्कॉलर होते, जिथून त्यांनी एमबीए केलं.
ऋषी सुनक यांनी ग्रॅज्युएशननंतर गोल्डमन सॅक्समध्ये काम केले आणि नंतर हेज फंड फर्ममध्ये भागीदार बनले.
राजकारणात येण्यापूर्वी ऋषी यांनी अब्जावधी पौंडांची जागतिक गुंतवणूक कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी ब्रिटनमधील छोट्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उपयुक्त ठरली.
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एमबीए करताना त्यांची भेट इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि ज्येष्ठ उद्योगपती नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीशी झाली, ज्यांच्याशी त्यांनी नंतर लग्न केलं. त्यांना कृष्णा आणि अनुष्का या दोन मुली आहेत.
राजकारणात प्रवेश
रिचमंड, यॉर्कशायरचे खासदार ऋषी सुनक 2015 मध्ये पहिल्यांदा संसदेत पोहोचले. त्यावेळी ब्रेक्झिटला पाठिंबा दिल्यामुळं पक्षात त्यांचा दर्जा वाढत गेला.
ऋषी यांनी तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात कनिष्ठ मंत्री म्हणून काम केलं होतं. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा उगवता तारा म्हणून त्यांच्याकडं नेहमीच पाहिले जात असे. पक्षातील अनेक बडे नेते त्यांचं वारंवार कौतुक करत आहेत.
ऋषी सुनक हे तंदुरुस्तीच्या बाबतीत खूप उत्साही आहेत. क्रिकेट, फुटबॉल व्यतिरिक्त त्या चित्रपट पाहण्याचीही आवड आहे. त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व पाहून त्यांना डिश ऋषी या टोपण नावानेही संबोधले जाते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे