अजित पवार म्हणतात…दोन दिवस थांबा

मुंबई : अजित पवार यांनी मनधरणी करण्यासाठी आलेल्या नेत्यांना ‘दोन दिवस थांबा’ एवढेच सूचक उत्तर अजित पवार यांनी दिल्याने अनेक तर्कविर्तक लढविले जात आहेत.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सोमवारी पहिल्यांदाच अजित पवारांनी विधानभवनात पाऊल ठेवले. स्मृतीदिनानिमित्त यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर ते विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात चार तास बसून होते. मात्र त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला नाही.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे यांनी भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. निवडणूका, सत्ता येते. जाते पण नाती कायम असतात. ती टिकवायची असतात, असे त्यांनी पवार यांना समजावण्याचा प्रयत्न केला.
गेली दोन दिवस अजित पवारांचे मन वळविण्याचा प्रयत्न होत आहे. सोमवारी सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे आदींनी त्यांची भेट घेतलीं होती. मात्र, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नव्हता. आज मात्र ‘दोन दिवस थांबा’! असे उत्तर अजित पवार यांनी दिले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा