पुणे १८ जुलै २०२२ : प्रसिद्ध गायक भुपेंदर सिंह यांचे दीर्घ आजारानंतर वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. किडनीच्सा विकारांनी त्रस्त असलेल्या भूपेंदर सिंह यांच्यावर गेल्या काही काळापासून उपचार सुरु होते. पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनाच्या बातमीची त्यांची पत्नी मिताली सिंह यांनी पुष्टी दिली.
दिल ढुंढता है फिर वही, दुक्क्की पे दुक्क्की हो, या सत्ते पे सत्ता या गाण्याने तमाम देशाला वेड लावले. मौसम, सत्ते पे सत्ता, अहिस्ता अहिस्ता, दुरियां, हकीकत अशा चित्रपटांची त्याची गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत.
भूपेंदर सिंह यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९४० रोजी अमृतसर येथे झाला. त्यांचे वडिल प्रोफेसर नत्था हे देखील उत्तम संगीतकार होते. त्यांच्याबरोबर भुपेंदरसिंह ॲाल इंडिया रेडियोवर गायला जात होते. त्यानंतर त्यांनी १९८० मध्ये मिताली सिंह यांच्याशी विवाह केला. त्यांना कुठलेही अपत्य नाही.
गुलजार यांच्यामुंळे १९७८ मध्ये त्यांना प्रसिद्धी मिळाली. नंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांचे गाणे आजही अजरामर आहे आणि राहील.
आज त्यांचे सूर गळ्यातून हरवले , पण कानात सतत रुंजी घालत राहतील. अशा या अजरामर गायक भूपेंदर सिंह यांना न्यूज अनकटची भावपूर्ण आदरांजली …
न्यूज अनकट प्रतिनिधी -तृप्ती पारसनीस