बंगालमध्ये आणखी एक नोकरभरती घोटाळा! एम्स भरतीबाबत सीआयडीने केली भाजप आमदाराच्या मुलीची चौकशी

कोलकत्ता, २ ऑगस्ट २०२२: पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारही अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. तिकडे CID ने कल्याणी AIIMS (AIIMS, Kalyani) मधील भरतीसंदर्भात तपास तीव्र केला आहे. या प्रकरणी सीआयडीने आज भाजप आमदार निलाद्री शेखर दाना यांच्या मुलीची अनेक तास चौकशी केली.

बंगालमधील शिक्षण भरती घोटाळ्याची चौकशी आधीच सुरू आहे. यामध्ये ईडीने टीएमसी नेते आणि राज्यमंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांना अटक केली आहे.

कल्याणी एम्समधील भरतीचे प्रकरण काय आहे?

बांकुरा येथील भाजप आमदार निलाद्री शेखर यांच्यावर आपल्या प्रभावाने मुलगी मैत्री दानाला कल्याणी एम्समध्ये नोकरी मिळवून दिल्याचा आरोप आहे. सीआयडीच्या 4 अधिकाऱ्यांनी आज बांकुरा येथील निलाद्री शेखरच्या घरी पोहोचून बराच वेळ चौकशी केली.

याप्रकरणी महिनाभरापूर्वी कल्याणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. आरोपानुसार, कल्याणी एम्समध्ये भरतीदरम्यान घोटाळा झाला होता आणि सीआयडीने तपास हाती घेताच गेल्या आठवड्यात नादिया येथील चकडा येथील भाजप आमदार बंकिम घोष यांची सून अनुसया घोष धर हिची चौकशी केली होती.

या प्रकरणी भाजपच्या अनेक नेत्यांवर आपल्या प्रभावाचा वापर करून नातेवाईकांना कल्याणी एम्समध्ये नोकरी मिळवून दिल्याचा आरोप होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एफआयआरमध्ये एकूण ८ जणांची नावे आहेत. हा एफआयआर २० मे रोजी नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात, आयपीसी कलम ४२० (फसवणूक), ४०६, १३०-बी (गुन्हेगारी कट) इत्यादी अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.

आमदार निलाद्री यांच्या मुलीला डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून ३० हजार रुपये प्रति महिना पगाराची नोकरी देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर ती परीक्षा द्यायलाही गेली नव्हती.

आमदार निलाद्री यांनी यापूर्वीच हे आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणात भाजप खासदार जगन्नाथ सरकार यांचेही नाव पुढे आले आहे. ते म्हणाले होते की सीआयडी सत्ताधारी टीएमसीच्या आदेशानुसार काम करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा