मुंबई: पुरुषांमध्येही ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढत आहे. जवळपास ६५ टक्के पुरुष हे ऑनलाईन शॉपिंग करतात.
त्यापैकी २९ टक्के पुरुष हे केवळ ऑनलाईन शॉपिंगच करीत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी किराणा, कृत्रिम दागिने व अंतर्वस्त्रांची खरेदी ही दुकानात जाऊनच केली जात असल्याचेही दिसून येत आहे.
राज्यातील विविध शहरांत केलेल्या सर्वेक्षणातून पुरुष ग्राहकांच्या खरेदीची पद्धत व त्यासाठी वापरली जाणारी साधने याविषयी माहिती मिळाली आहे.
दरम्यान सेलच्या नवनवीन ऑफर्स तसेच प्रमोशन याबाबतची माहिती मिळविण्यासाठी पुरुष हे मुख्यत: दूरचित्रवाणी व वृत्तपत्रांवर अवलंबून असल्याचे दिसून आले आहे. तसेच मित्रांकडून मिळणारी तोंडी माहितीही पुरुषांच्याबाबतीत महत्त्वाची असल्याचे दिसून येते. बूट, पट्टे व शर्ट्सची ऑनलाईन खरेदी केली जाते.