लाज रखवी म्हणून अजित पवारांचा राजीनामा

मुंबई: गेल्या आठवड्याभरात सत्तास्थापनेत सुरू असलेल्या घडामोडी मध्ये अजित पवार यांनी भाजपासोबत अचानक सरकार स्थापन केले हा एक राजकीय भूकंप ठरला तर काल त्यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत राजकारणातील दुसरा भूकंप घडवून आणला.
अजित पवारांच्या या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे म्हणाले की, लाज राखाली जावी म्हणून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर प्रतिक्रिया देताना खडसे म्हणाले की विधीमंडळात विश्वासदर्शक ठरावावर मतदान होईपर्यंत अजित पवार थांबले असते तर ते त्यांच्यासाठी आणखी मान हानिकारक ठरले असते. त्यामुळे लाज राखण्यासाठी त्यांनी आजच उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे हे अपेक्षितच होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा