१ लिटर दुधासाठी ८० रुपये मोजावे लागणार तर सुट्टे दुध झाले ७ रुपयांनी महाग

मुंबई, २९ ऑगस्ट २०२२: मागील वर्षभरात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाच्या दरात प्रतिलिटर अनुक्रमे तीन वेळा वाढ करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिलिटर दुधाला किमान ३५ रुपयांचा दर मिळू लागला होता. पण विक्री दरात गेल्या वर्षभरापासून एकदाही वाढ करण्यात आली नाही. मध्यंतरी विजेच्या दरात, इंधन (डिझेल) आणि दूध पॅकिंग करण्यासाठी आवश्‍यक साहित्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

जनावराच्या चाऱ्याचा खर्च वाढला आहे आणि चाऱ्याचा खर्च वाढल्याचा फटका दूध उत्पादकांना बसत असल्यामुळे ही वाढ करण्यात आली आहे. परिणामी दूध उत्पादकांनी सुट्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. महागाई फटका सर्वसामान्यांना बसत आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची तयारी धुम धाम सुरू आहे आणि ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये महागाईचा फटका सर्व सामान्यांना बसणार आहे.

काही दिवसा पूर्वीच अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर आता मुंबईत सुट्या दुधाचे दर वाढणार आहेत. मुंबईत १ सप्टेंबरपासून सुटे दूध ७ रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे एक लिटर दुधासाठी ग्राहकांना आता ८० रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ १ सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार आहे. तसेच ही नवीन दर वाढ २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत लागू असेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा