महाराष्ट्रात नाकारलेला फॉक्सकॉन-वेदांत प्रकल्प अखेर आहे तरी काय?

पुणे, १६ सप्टेंबर २०२२: महाराष्ट्रात होणारा वेदांता आणि फोक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरात मध्ये हलवण्यावरून सध्या राज्यात चांगलंच राजकारण पेटलय. चला तर मग जाणून घेऊया आजच्या न्यूज अनकट च्या एक्सप्लेनर मध्ये की फॉक्सकॉन वेदांत प्रकल्प नक्की काय आहे आणि महाराष्ट्राला यामुळं काय तोटा होणारेय.

देशातील वेदांता ग्रुप आणि तैवानची जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक उपकरणं बनवणारी कंपनी फॉक्सकॉ़न यांच्यात करार झाला. या कंपनीनं महाराष्ट्रासोबत तळेगावमध्ये प्रकल्प उभारण्याची बोलणी केली होती, परंतू गुजरातमध्ये प्रकल्पाची घोषणा केली.

तर हा प्रकल्प म्हणजे आता प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूला सेमीकंडक्टर (चीप) ची गरज असते. या चीपनिर्मितीत जगात तैवान आघाडीवर आहे. भारतात चीप निर्मितीचा एकही प्रकल्प नाही. त्यासाठी भारतात काम सुरू होतं. या प्रकल्पासाठी वेदांत आणि फोक्सकॉन लिमिटेडकडून हालचाली सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक ही राज्यं हा प्रकल्प आपल्याकडं खेचण्यासाठी स्पर्धेत होती. पण अचानक हा प्रकल्प गुजरातमध्ये हलवणार असल्याची घोषणा केलीये.

पण, यामुळं महाराष्ट्राला तोटा झालाय. वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी १.५४ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाणार होती. ज्यामाध्यमातून ८० हजार ते एक लाख रोजगार निर्माण झाला असता. यातून ३० टक्के रोजगार हा थेट आणि ७० टक्के अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती झाली असती.

प्रकल्पात जवळपास पावणे दोन लाख कोटींची गुंतवणूत केली जाणार होती. या माध्यमातून डिस्प्ले फॅब्रिकेशन, सेमीकंडक्टर्स, सेमीकंडक्टर असेंबली आणि टेस्टिंग फॅसिलिटीसाठी अनुक्रमे १ लाख कोटी, ६३ हजार कोटी, ३,८०० कोटी खर्च केले जाणार होते. यातून महाराष्ट्राला मोठा प्रमाणात कर मिळाला असता.

अहमदाबादमध्ये १००० एकर जमिनीवर हा प्लँट उभारला जाणार आहे. या प्रोजेक्टमधून जवळपास १ लाख रोजगारही उपलब्ध होतील. फॉक्सकॉन आणि वेदांत या दोन्ही कंपन्या मिळून इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात काम करतायेत. फॉक्सकॉन ही तायवानची कंपनी आहे. परंतु आता फॉक्सकॉन मोठ्या प्रमाणात भारतात गुंतवणूक करत आहे, कारण तायवानचे चीनशी असलेले संबंध खराब झाल्यानंतर या कंपनीचं लक्ष भारतावर अधिक आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा