पुण्यातील होळकरवाडी येथे शरीर शुध्दी शिबिराचे आयोजन, आरोग्यम योगाश्रमचे आनंत झांबरे यांची माहिती

पुणे, दिनांक १ ऑक्टोबर २०२२ : संजीवनी, आहार व योग या त्रिसुत्रीच्या माध्यमातुन माणसाला एकही गोळी, औषध न घेता जगातील सर्व आजारांसाठी विना अपायकारक पद्धतीने सर्व आजारांसाठी शरीर शुद्धी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एक ऑक्टोबर गांधी जयंती दिनी, पुण्यातील होळकरवाडी (हांडेवाडी जवळ) येथे शरीरशुद्धी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आरोग्य योगाश्रम चे आनंद झांबरे यांनी दिली.

या शिबिराच्या माध्यमातून संजीवनी क्रियेसह उत्कृष्ट अशा निसर्गोपचारातील आहाराच्या रेसिपीज डेव्हलप केलेल्या आहेत. ज्यामुळे आहारातील पदार्थ आपणास वारंवार खावेसे वाटतील. आणि त्याचा मनुष्य पुरेपूर लाभही मिळणार आहे. गॅस, पित्त, शुगर, वातांचे आजार, पोटाचे विकार, वजन यावर शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे.

प्रत्येक माणसाला काही ना काही व्याधी असतात. परंतु मनुष्य प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या चालढकल करून त्याकडे कानाडोळा करत असतो. या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळण्यासाठी शिबिरामध्ये बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन आरोग्यम योगाश्रम चे अनंत झांबरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा