CDS अनिल चौहान यांना दिल्ली पोलिसांकडून मिळणार ‘Z’ सुरक्षा

नवी दिल्ली ३ ऑक्टोंबर २०२२ : केंद्र सरकारने नवनिर्वाचित चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांना झेड श्रेणीची सुरक्षा दिली आहे. दिल्ली पोलिसांकडून त्यांना हे सुरक्षा कवच देण्यात येणार आहे.

गृह मंत्रालयाच्या सूत्राकडून मिळालेल्यामाहितीनुसार, नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांना झेड श्रेणीची सुरक्षा पुरवली जात आहे. इंटेलिजन्स ब्युरोच्या थ्रेट पर्सेप्शन रिपोर्टच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये दिल्ली पोलिसांचे कमांडो त्यांना सुरक्षा पुरवतील.

जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर सीडीएसचे लष्करी पद रिक्त झाले होते. त्यानंतर सरकारने २८ सप्टेंबर रोजी लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती केली. लेफ्टनंट जनरल चौहान हे मे २०२१ मध्ये ईस्टर्न कमांडचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले आहेत.

दरम्यान, आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत लेफ्टनंट जनरल (नि.) अनिल चौहान यांनी अनेक कमांड, स्टाफ आणि असिस्टंट यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यांना जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील दहशतवादाविरोधी कारवायांचा मोठा अनुभव आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा