पुणे, १५ ऑक्टोंबर २०२२: कार्टून नेटवर्क हे चॅनल काही नवीन नाही. ९० च्या दशकातील बालकांचं कार्टून नेटवर्क सोबत एक वेगळच नात आहे. आजही जून्या कार्टून्स चा विषय निघाला तर ती मूल त्यांचा भूतकाळाच्या आठवणींमधे रमून जातात. शाळेत जाण्या अगोदर आणि शाळेतून आल्या नंतर पहिलं काम काय ? तर टीव्ही वर आपलं आवडतं कार्टून बघणं. पॉवर पफ गर्ल्स, स्कूबी डू, टॉम अँड जेरी, द फ्लिंगस्टोन्स, जॉनी ब्रावो, बेन १०, करेज द कॉवर्डली डॉग असे कित्येक शोज आपण पाहिले असतील. त्या काळी आज सारखे मोबाईल फोन, टॅब, स्मार्ट टीव्ही नसल्याने लहान मुलांमधे या कार्टून्सचे फार वेड होते.
पण अखेर ३० वर्षा नंतर आता कार्टून नेटवर्क हे कायमचं बंद होणार असे बोलले जाते. कार्टून नेटवर्क लवकरच वॉर्नर ब्रदर्स सोबात विलीन होणार आहे. ही माहिती बाहेर येताच चाहत्यांमधये नाराजी पसरली. ट्विटर वर #Ripcartoonnetwork हा हॅशटॅग ट्रेंड व्हायला सुरुवात झाली. या चॅनल ची स्थिती नीट नसल्याने इथे काम करण्याऱ्या २६% कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या खबरी समोर आल्या. काही ट्विटर युजर्स ने त्यांचे बालपण अविस्मरणीय केल्या बद्दल कार्टून नेटवर्क चे आभार व्यक्त केले.
हे सर्व सुरू असतानाच चॅनल ने एका ट्विट व्दारे हे स्पष्ट केलं की , “आम्ही संपलो नाहीये आणि कुठेही जात नाहीये. आम्हाला ३० वर्ष पूर्ण झाली आणि आम्ही असेच नाविन्यपूर्ण कार्टून्स घेऊन येत राहू”.
न्यूज अनकट प्रतिनिधी : केतकी कालेकर