नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर २०२२: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयकडून पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले आहे. सीबीआय कडून सोमवारी सकाळी ११ वाजता त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. स्वतः सिसोदिया यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
मनीष सिसोदिया यांचे ट्विट :
‘माझ्या घरावर १४ तास सीबीआयने छापा टाकला, काहीही सापडले नाही. माझ्या बँकेच्या लॉकरची झडती घेतली, त्यातही काहीही सापडले नाही. माझ्या गावात त्यांना काही सापडले नाही. आता त्यांनी मला उद्या सकाळी ११ वाजता सीबीआय मुख्यालयात बोलावले आहे. मी जाऊन पूर्ण सहकार्य करेन. सत्यमेव जयते’
हे ‘आजचे भगतसिंग’ : केजरीवाल
यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, हा स्वातंत्र्याचा दुसरा लढा आहे. मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन हे ‘आजचे भगतसिंग’ आहेत, असे वर्णन त्यांनी यावेळी केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.