भारताच्या डी गुकेशनं रचला इतिहास; सोळा वर्षीय मुलाने वर्ल्ड चॅम्पियनला हरवलं!

चैन्नई,१७ ऑक्टोबर २०२२: भारताचा १६ वर्षीय ग्रँडमास्टर डी गुकेश यानी इतिहास रचला आहे. एमचेस रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत त्याने जगातील एक नंबर खेळाडू मॅग्नस कार्लसनला हरवले आहे. या कामगिरीमुळे तो वर्ल्ड चॅम्पियनला हरवणारा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे.

चैन्नईच्या गुकेशने पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळत २९ चालींमध्ये विजय मिळवला आहे. गुकेश आता १२ फेऱ्यानंतर २१ गुणांसह पोलंडचा जॅन-क्रिझिस्टोफ डुडा २५ गुण आणि अझरबैजानचा शाखरियार मामेदियारोव २३ गुण यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर आहे.

गुकेशला १०व्या फेरीत डुडा याने पराभुत केले होते. पण पुढच्या दोन फेऱ्यामध्ये मामेदियारोव आणि एरिक हॅन्सन याना हरवून त्याने जोरदार पुनरागमन केले. भारताच्या अर्जून एरिगेसीचे गुकेश एवढेच गुण आहेत आणि तो चौथ्या क्रमांकावर आहे.

मॅग्नसला पराभूत करणारा गुकेश हा भारतातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. यामुळे त्यांच्यावर आनंदाचा वर्शाव होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा