नाशिकला होणार यंदाचे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन.

नाशिक, २१ ऑक्टोबर २०२२ : या वर्षीचे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, नाशिक येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात पार पडणार आहे. २४ व २५ डिसेंबर राेजी हाेणाऱ्या या संमेलनात ९ परिसंवाद, कविसंमेलन, एकपात्री नाटक, चित्रकला स्पर्धा होणार आहेत.

मुस्लिम मराठी साहित्य परिषदेच्या वतीन आयोजित यंदाचे हे नववे मुस्लिम मराठी साहित्य आहे. नाशिक येथे परिषदेच्या झालेल्या बैठकीत केवळ स्वागताध्यक्षांची निवड झाली. या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कामगार नेते तथा सामाजिक विचारवंत इरफान रशीद शेख यांची एकमताने निवड करण्यात आली. नाशिकला दुसऱ्यांदा संमेलन होत आहे.

लवकरच कार्यक्रम पत्रिका, बोधचिन्हदेखील प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे स्वागताध्यक्ष शेख यांनी सांगितले. येत्या ३० ऑक्टोबरला संमेलन अध्यक्षांची निवड होणार आहे. निवड समितीमध्ये सोलापूरच्या साहित्यिकांचा समावेश आहे. संमेलनासाठी सोलापूरचे साहित्यिक सुध्दा परिश्रम घेत आहेत.

संमेलनामध्ये लेखक, गीतकार जावेद अख्तर, माजी कुलगुरू फैजान मुस्तफा, सरफराज शेख, प्रा. जावेद पाशा उपस्थित राहणार अशी माहिती नाशिकचे प्राचार्य डॉ. फारुक शेख यांनी दिली.संमेलनासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा