राजघराण्यात स्त्रियांचेच वर्चस्व

पुणे, २७ ऑक्टोबर २०२२ : सोशल मिडीया प्रत्येक गोष्ट टिपत असतो. त्याच्या नजरेतून काही सुटत नाही. नुकताच किंग चार्ल्स आणि प्रिन्सेस कॅमेला यांचा एक फोटो सोशल मिडियावर अपलोड झाला. त्यावरुन हे दिसून आले की, राजघराण्यात स्त्रियांचे वर्चस्व कायम आहे. याआधी क्वीन एलिझाबेथ हिचे वर्चस्व असल्याचं आपण जाणतोच.

प्रिन्सेस कॅमेला कायमच चर्चेत राहिली आहे. प्रिन्सेस कॅमेला ही सर्वात आधी प्रिन्सेस डायनाची मैत्रिण म्हणून किंग चार्ल्सच्या आयुष्यात आली. नंतर तीने चार्ल्सच्या मनाचाही ताबा घेतला आणि डायना आणि चार्ल्स यांचे सांसरिक आयुष्य देखील उद्धवस्त झाले. त्यानंतर कॅमेला आणि चार्ल्स यांचा विवाह होऊन कॅमला राणी झाली.

सध्या या दोघांचा एक फोटो सोशल मिडियावर आला आहे. ज्यात असं सांगितलं आहे की, चार्ल्सच्या प्रत्येक निर्णयात कॅमेलाचा जास्त प्रभाव आहे. तिच्याशिवाय तो निर्णयच घेत नाही. असं दिसून आलं आहे. त्यामुळे चार्ल्सला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. पण त्यामुळे पुन्हा एकदा स्त्रियांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

ज्याप्रमाणे अंबानी घराण्यात नीता अंबानी यांचे वर्चस्व असल्याचे बोलले जाते, त्याप्रमाणे राजघराण्यात प्रिन्सेस कॅमेलाचे वर्चस्व आहे, हे दिसून येते.
म्हणजे पुन्हा एकदा स्त्रियांचीच चलती आहे, हे स्पष्ट झालं.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा