उत्तर प्रदेश : ‘या’ १४ रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर कमी

लखनऊ, ४ नोव्हेंबर २०२२: सणांच्या काळात, यूपीमधील अनेक रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. दरम्यान, सण संपल्यानंतर पुन्हा एकदा दरात कपात करण्यात आलीय.

खरं तर रेल्वेनं दिवाळी आणि छठ पूजेमुळं प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर ५० रुपये केले आहेत. पण आता यूपीच्या या १४ रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत कमी म्हणजेच पुन्हा १० रुपये करण्यात आलीय.

गुरुवारी रात्री उशिरा उत्तर रेल्वेकडून या संदर्भातील माहिती देण्यात आली. माहिती देताना वरिष्ठ डीसीएम रेखा शर्मा म्हणाल्या, एकूण १४ रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर १० रुपये करण्यात आलेत. दिवाळी आणि छठ पूजेमुळं दर ५० रुपये करण्यात आले होते, आता पूर्वीप्रमाणे १० रुपयेच घेतले जाणार आहेत.

‘ही’ आहेत रेल्वे स्थानकं :

लखनऊ, वाराणसी, बाराबंकी, अयोध्या कॅंट, अयोध्या जंक्शन, अकबरपूर, शहागंज, जौनपूर, सुलतानपूर जंक्शन, रायबरेली, जंघाई, भदोही, प्रतापगड आणि उन्नाव जंक्शन येथे तिकिटं स्वस्त झाली आहेत.

दरम्यान, रेल्वेने तिकीट दरवाढीचा निर्णय २६ ऑक्टोबरपासून लागू केला होता, त्यानंतर तो ६ नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार असल्याचं सांगण्यात आलं. प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात वाढ करून प्लॅटफॉर्मवर येणारी गर्दी रोखता येईल, असा रेल्वेचा प्रयत्न होता. जेणेकरून मोठी दुर्घटना टळू शकेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा