ग्रामपंचायतींच्या कामात होणार बदल? जिल्हा परिषदेकडून अभ्यासगटाची स्थापना

पुणे, १० नोव्हेंबर २०२२: जिल्हा परिषदेच्या कामकाजात बदल होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेकडून एका अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे. हा अभ्यासगट जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कामकाजात सुत्रता आणण्यासाठी काम करणार असून सध्याची कामकाज पद्धती आणि कामात सुधारना आणण्यासाठी हा बदल आवश्यक आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी नऊ सदस्यीय जिल्हास्तरीय अभ्यासगटाची स्थापना करण्यात आलीय. मांजरी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य राहूल काळभोर या अभ्यासगटाच्या अध्यक्षपदी असणार आहे.

जिल्हा परिषदेने केलेल्या या अभ्यासगटातील सदस्यांमध्ये ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रातील अधिव्याख्यात्या सोनाली घुले, जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरद माळी, बारामतीचे गटविकास अधिकारी अनिल बागल, मुळशी पंचायत समितीतील विस्तार अधिकारी सुनील जाधव या सर्वांचा समावेश आहे‌.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा